Dehu : देहूमध्ये 20 लाख रुपये थकबाकी असलेल्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

एमपीसी न्यूज –  देहूगाव नगरपंचायतीच्यावतीने काही कंपन्यांनी  वर्षाअखेरीस कर (Dehu) भरण्यासाठी अवाहन करूनही कर न भरलेला नाही. या मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून  आज (दि.20 )  करसंकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी या मालमत्ता  सील केल्या आहेत.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नगरपंचायतीच्या वतीने करवसुलीसाठी नोटीसा बजावुन दवंडी देऊन कर भरण्यासंदर्भात जाहीर अवाहन केले होते. त्यानंतर मोठ्या थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या घरांपुढे ढोल वाजवुन सुमारे 4 कोटी रुपयांची वसुली केली होती. तर महिना अखेरीस जोरदार कर वसुली मोहिम सुरू केली असून मालमत्ता कर न भरणाऱ्या (Dehu) मालमत्ता धारकांच्य़ा मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

Pune : विविध नविनयपूर्ण उपक्रमांनी एनआयपीएम संस्थेचा 44 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

या बाबत माहिती देताना करसंकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले, देहू बाह्यवळण मार्गावर चालु स्थितीत असलेल्या चार कंपन्या सील केल्या आहेत. यापैकी तीन कंपन्या एकाच मालकाच्या असून त्याच्यांकडे तीन कंपन्या मिळून 13  लाख 65 हजार रुपये थकबाकी आहे. तर एका कंपनी मालकाकडे 7 लाख 90 हजार रुपये थकबाकी आहे.

या कंपन्यांना कर भरण्यासंदर्भात सुचना देण्यासाठी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या असून त्यांना वारंवार नोटीसा देखील बजावल्या आहेत. या चारही कंपन्या जागा मालकांनी भाड्याने दिल्या असून कंपनीकडून ते नियमित भाडे वसुलही करीत आहेत. मात्र नगरपंचायतीचा कर भरण्यास ते टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या चारही कंपन्यांवर कारवाई करून त्या सील करण्यात आल्या आहेत.

या कारवाईत कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, पाणीपुरवठा अधिकारी धनंजय नाईकवडे, कर विभागाचे कर्मचारी आशा मोरे, अजय वाल्मिकी, आसिफ शेख, सुरेश खंडागळे, दत्ता शिंदे, महेश पाटोळे, ज्ञानेश्वर निकम, प्रतीक चव्हाण व पोलीसांच्या उपस्थितीत या पथकाने ही कारवाई करण्यात (Dehu) आली .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.