Pune : व्यावसायिकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाला दोघांनी (Pune) मारहाण करत दोन इसमांनी हाताने मारहाण करत तब्बल एक लाख रुपयांना लुटले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.8) बोपखेल येथे घडला आहे.

याप्रकरणी सुरेश राम तलारी (वय 42, रा.बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सोमनाथ दत्तात्रय तोंडीलकर (वय 35, रा. बोपखेल) व अरविंद रमेश जोगदंड (वय 32, रा.बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

PCMC News : ‘मुळा’ पुनरूज्जीवनासाठीची दोन्ही पालिकांची संयुक्त निविदा रद्द; पिंपरी पालिकेची 330 कोटींची निविदा प्रसिद्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलारी हे व्यावसायीक असून ते गुरुवारी त्यांच्या मुलासाठी औषध अनण्यासाठी जात होते. यावेळी आरोपींनी (Pune) त्यांना अडवले व त्यांच्या हातातील 14 ग्रॅम वजनाच्या 50 हजार रुपयांच्या तीन अंगठ्या व रोख 50 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच हाताने मारहाण केली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.