Pune : बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्विस पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात अखेर गुन्हा दाखल, रिक्षा चालकांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज : कुठलीही परवानगी (Pune) नसताना ऑनलाईन ॲप तयार करून राज्यभरात बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्विस पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या अधिकाऱ्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्विस बंद करण्यात यावी या मागणीसाठी मागील अनेक महिन्यांपासून पुण्यातील रिक्षा संघटना पाठपुरावा करत आहे. यासाठी 28 नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालकांनी बेमुदत बंदची हाक दिली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरटीओने अखेर या रॅपिडो कंपनी विरोधात तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील आणि त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत रामराजे भोसले ( वय 38, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune Murder Case : लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवले; लग्नाचा तगादा लावताच अल्पवयीन मुलीचा खून

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जानेवारी 2021 पासून रॅपिडो या (Pune) कंपनीने राज्यभरात बाईक टॅक्सी सर्विस सेवा सुरू केली आहे. प्रत्यक्षात या कंपनीने राज्य शासनाची अथवा आरटीओची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. बेकायदेशीर ऑनलाईन ॲप तयार करून त्याद्वारे बुकिंग करून प्रवाशांची वाहतूक या कंपनीतर्फे केली जात होती. या विरोधात रिक्षा चालकांकडून वारंवार आवाज उठवला जात होता. आंदोलन केली जात होती. मात्र असं असतानाही आरटीओने अथवा राज्य सरकारने याची दखल घेतली नव्हती.

याच्या विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालकांनी 28 नोव्हेंबरपासून बेमुदत बंदची हाक दिली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरटीओ प्रशासनाने या कंपनी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.. पोलिसांनी या विरोधात गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.