Pune : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथे रंगली कबड्डी स्पर्धा

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune) यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन बाणेर आयोजित करण्यात आलेल्या पुणे लीग व राज्य स्तरीय पुरुष व महिला सतेज करंडक कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात एनटीपीएस नंदुरबार संघाने वाघजाई रत्नागिरी संघावर 34-33 असा अवघ्या एक गुणांनी निसटता विजय मिळविला.

मध्यंतराला एनटीपीएस नंदुरबार संघ 15-18 अशा पिछाडीवर होता. मात्र मध्यंतरानंतर एनटीपीएसच्या पिछाडी भरून काढत आपल्या संघाचा विजय साकार केला. एनटीपीएस संघाच्या ऋषिकेश बनकर याने मध्यंतरापुर्वी चौफेर चढाया जोरदार हल्ला चढविला.

ऋषिकेश बनकर याने संपुर्ण सामन्यात चढाईत 10 गुण मिळविले. त्याला तेजस कुंभार याने 6 गुण मिळवूव चांगली साथ दिली. प्रशांत नागरे याने चेढाईत 2 गुण व 2 पकडी घेत 4 गुण मिळविले. रविंद्र कुमावत याने 3 गुण व 1 पकड घेतली. श्रेयस उंबरदंड व विवेक राजगुरू यांनी प्रत्येकी 3 पकडी घेतल्या. तर ओंकार गुडे याने 2 पकडी घेतल्या.

वाघजाई संघाने पहिल्या डावात जोरदार हल्ला चढवित 3 गुणांची (Pune)  आघाडी घेतली होती. मात्र मध्यंतरानंतर एनटीपीएस संघाने देखील नेटाने व हुशारीने खेळ करीत प्रतिकार वाढविला. त्यामुळे वाघजाई संघाला पराभव पत्करावा लागला. वाघजाई संघाच्या अजिंक्य पवार या हुकमी चढाई पट्टूने आक्रमक चढायांमध्ये 11 गुण व एक पकड घेत 12 गुण वसुल करीत कडवे आव्हान उभे केले होते.

त्याला ओंकार कुंभार याने चढाईत 5 गुणांसह एक पकड घेत 6 गुण मिळवित कडवा प्रतिकार केला. त्यांना श्रीपत कुंभार याने 5 पकडी व साईराज कुंभार याने चढाईत 1 गुण व 3 पकडी करीत 4 गुण मिळविले आणि सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश न आल्याने पराभव पत्करावा लागला.

पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बाबुराव चांदेरे फौडेशन नांदेड संघाने भैरवनाथ सुस गांव संघाचा 30-11 धुव्वा उडवित सहज विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाकडे 30-11 अशी आघाडी होती.

Alandi : आळंदीमध्ये विविध संस्थेत डोळे लागण साथीची तपासणी; रुग्णांचा आकडा 4900 पार

सामन्याच्या सुरवाती पासुनच बाबुराव चांदेरे फौडेशनच्या संघाने सुरवाची पासुनच आक्रमक धोरण स्विकारत भैरवनाथ संघावर दबाव निर्माण केला व त्यांचा बचाव उद्वस्त करीत आक्रमण देखील थोपविले. बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाच्या अजित चव्हाण याने चढाईत 12 गुण मिळविले.

अक्षय सूर्यवंशी याने 10 गुण मिळविले. राम अडागळे याने 3 पकडी घेतल्या. भैरवनाथ सूस संघाच्या निलेश काळबेरे याने 8  गुण मिळविले. व सुलतान डांगे याने 5 गुण मिळवित काहीसा प्रतिकार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.