Loni Kalbhor : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने (Loni Kalbhor) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली.

याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल मयूर चौधरी  (वय 29, रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत तिचा भाऊ इंद्रजीत नारायण कांचन (वय 24, रा. उरुळी कांचन) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथे रंगली कबड्डी स्पर्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलचा पती मयूर चौधरी याचा सिमेंटचे पाइप तयार करण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायात तोटा झाल्याने त्याने स्नेहलला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली होती. भावाने घरातील दुभती गाय विकून मयूरला दोन लाख रुपये दिले होते. त्यानंतरही मयूरने पैसे आणण्यासाठी स्नेहलकडे तगादा लावला होता.

छळाला कंटाळून स्नेहलने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत (Loni Kalbhor) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.