Pune : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अखेर आरपीएफ कर्मचाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने (Pune) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ऑक्टोबरमध्ये पुण्यात घडली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्याला आज अखेरअटक करण्यात आली. आरपीएफ जवान अनिल पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला या प्रकरणी याआधीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

Hinjawadi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

हवालदार पवार याने रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. याच संस्थेत हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. मनसे नेते वसंत मोरे यांनी आरोपी आरपीएफ जवान याच्या बायकोच्या नावावर असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीचे पुण्यातील ऑफिस फोडले होते.

आज अखेर त्याला पोलिसांनी अटक केली –

छत्तीसगडमधील मधील एक जिल्हा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात एक अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात सापडले. या दोघांना पवारने डांबून ठेवून त्या मुलीवर अत्याचार केले होते.

आरोपी हवालदार पवार याने ताडीवाला रस्त्यावरील एक बेकायदा संस्था सुरू केली होती. रेल्वे स्थानकात पळून आलेल्या परराज्यातील मुलींना हेरुन हवालदार पवार आणि त्याचे साथीदार सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत घेऊन जायचे. तेथे (Pune) त्यांना धमकावून पैसे काढायचे. पवार हरवलेल्या व्यक्तींची नोंद न करता परस्पर पळून आलेल्या मुलांना या बिल्डिंगमध्ये कोंडून ठेवायचा आणि त्यासाठी काही माणसांना देखील कामावर ठेवलं होतं. घडलेल्या प्रकरणामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.