Pune : जेवणाचा डबा न दिल्याने वाद, पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात जेवणाचा (Pune) डबा न दिल्याने पती-पत्नीत भांडण झाले. रागाच्या भरात पतीने मारहाण केली. या मारहाणीनंतर पत्नीला फिट आली. तिला तातडीने रुग्णालयात ऍडमिट केले असता तिचा मृत्यू झाला. कोंढवा परिसरातील उंड्री येथील होले वस्ती परिसरात ही घटना घडली.

शितल सोमनाथ पांडागळे (वय 27, रा. उंड्री) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सोमनाथ महादेव पांडागळे (वय 30) याला अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी सोमनाथ हा मोलमजुरीची कामे करतो तर मयत शीतल ही फिरस्ती होती. एकत्र काम करत असताना दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एका मंदिरात जाऊन विवाह केला. उंड्री परिसरात दोघेही भाड्याच्या खोलीत राहत होते.

दरम्यान शनिवारी सकाळी शितल हिला फिट आल्याने नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्याने डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत मयत महिलेच्या पतीला विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Chikhali : मुलाला आईकडे घेऊन गेलेल्या वडिलांना सासरच्यांकडून मारहाण

कामावर जाताना जेवणाचा डब्बा न दिल्यावरून दोघांत वाद झाला. वादानंतर लाकडी बांबूने शितलला मारहाण केली. मारहाणीनंतर काही वेळात तिला फिट आली व ती बेशुद्ध पडली. तिला (Pune) रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृतघोषित केले. तिच्या अंगावर व्रण दिसून आल्याने डॉक्टरांनी तसा अहवाल दिला. त्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.