Pune : हेल्मेट सक्तीसाठी आधी जनजागृती करावी; काँग्रेसची नवनियुक्त पोलिस आयुक्तांकडे विनंती

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune ) वतीने पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना गाय वासरू हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर पुणे शहरातील हेल्मेट सक्तीबाबत चर्चा करण्यात आली.

Moshi : मोशी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

नवनियुक्त पोलीस आयुक्तांना विनंती केली की, आपण सर्वप्रथम हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती करावी आणि त्यानंतर हेल्मेट सक्तीबाबत विचार करावा. त्यावर पोलिस आयुक्त म्हणाले की, आम्ही पाहिले जनजागृती करणार आहोत आणि त्यांनतरच पुढचे पाऊल उचलणार आहोत.

यानंतर पुणे शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येबाबत सविस्तर (Pune) चर्चा देखील करण्यात आली.  यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.