Pune : मावळ्यांच्या वेशात बालगोपाळांनी फोडली खेळण्यांची हंडी

    जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे आयोजन; अनाथ, दुर्गम भागातील मुलांना करणार खेळणी वाटप

एमपीसी न्यूज – बालगोपाळ व छत्रपती शिवरायांच्या ( Pune) बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ आणि नवयुग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव बालगोपाळ खेळणी दहीहंडीचे आयोजन केले होते. मावळा पगडी परिधान केलेले शालेय विद्यार्थी व बाळगोपाळांनी ही हंडी फोडली.

आपल्या मुलांना खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, या उद्देशाने बनवलेल्या ‘मावळा’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. यासह आवर्तन ढोल ताशा पथक व रुद्रांग वाद्यपथक (ट्रस्ट) पुणे यांचे बहारदार वादनाने खेळणी दहीहंडी उत्सवाला साज चढला.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, संयोजक व श्री शिवछत्रपती मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कान्होजी जेधे आणि . अ‍ॅड. ऋचा जेधे, दयानंद जेधे, मावळा बोर्डगेमचे अनिरुद्ध राजदेरकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ आदी ( Pune) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.