Chinchwad : टास्कच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – हॉटेल बुकिंगचा टास्क पूर्ण करण्यास ( Chinchwad) सांगत एका व्यक्तीची 22 लाख 33 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत मोहननगर चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी राजू गोपाल वेंकांना मेरम (वय 35, रा. मोहननगर चिंचवड. मूळ रा. नदीकुडा वारंगल) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : गणेश मंडळांना स्टेज परवाना शुल्क माफ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. त्यांना बनावट लिंक पाठवून त्याद्वारे हॉटेल बुकिंगचा टास्क पूर्ण करण्यास सांगितले. टास्क पूर्ण केल्यास फिर्यादी यांना मोठी रक्कम मिळणार असे आमिष देखील आरोपींनी दाखवले.

त्यानुसार फिर्यादी यांनी टास्क पूर्ण करत असताना 22 लाख 33 हजार 751 रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत ( Chinchwad) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.