PCMC : गणेश मंडळांना स्टेज परवाना शुल्क माफ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारणी केलेले मंडप, स्टेज व कमानीचे या वर्षीचे परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे.

Mahalunge : किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण करत धमकी

मंडळांना मंडप भाडे आकारण्यात येऊ नये, असा निर्णय झाला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे मंडळांकडून मंडप शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती. त्याची दखल महापालिकेने घेतली असून, या वर्षीचे परवाना शुल्क माफ करण्यात आले आहे.

याआधी शहरातील वसूल करण्यात आलेल्या शुल्काची संपूर्ण रक्कम संबंधित मंडळांना परत करण्यात यावी, असेही आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.