Mahalunge : किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण करत धमकी

एमपीसी न्यूज- साठलेल्या पाण्याला वाट करून दे म्हटले असता याचा राग येऊन एकाने लोखंडी पाइपने पती व पत्नीला मारहाण करत शिवीगाळ केली आहे. ही घटना बुधवारी(दि.6) सकाळी भांबोली येथे घडली.

Sangvi : पिंपळे गुरव येथे भरदिवसा घरफोडी करत दागिने व रोख रक्कम चोरीला

यावरून सुनील कचरू नवरे (वय 50 रा भांबोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश संजय नवरे (वय 35 रा.भांबोली ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी हे त्यांच्या घराच्या पाठीमागे गाडी पार्क करण्यासाठी गेले तेव्हा तिथे त्यांना पाणी साठलेली दिसले. यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला हे खराब पाणी पाईपलाईन काढून किंवा गटार काढून थोड्या अंतरावर सोड असे सांगितले. याचा राग घेऊन आरोपीने मी पाणी पुढे सोडणार नाही मी रोज इथेच पाणी सोडणार, असे म्हणत लोखंडी पाईपने फिर्यादीला मारहाण केली.

यावेळी फिर्यादी यांच्या पत्नी भांडणे सोडवण्यासाठी आल्या असता आरोपने त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. यावरून महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.