Sangvi : पिंपळे गुरव येथे भरदिवसा घरफोडी करत दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील बंद घराचा दरवाजा तोडून चोरांनी रोख रक्कम व दागिने चोरून नेले आहेत. हे घर पुढे पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर परिसरात बुधवारी (दि.6) दुपारी एक ते सव्वा तीन या कालावधीत घडली.

Nigdi : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात विविध कार्यक्रम

याप्रकरणी निखिल ओम प्रकाश कुमार (वय 33 रा पिंपळे गुरव) यांनी सांगवी (Sangvi ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना भर दिवसा चोरांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला यावेळी त्यांनी घरातून 27 हजार पाचशे रोख रक्कम व 7 हजार 250 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 34 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सांगवी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.