Pune : वानवडी येथील घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी करून चोरटयांनी साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.31) रात्री 10 नंतर वानवडी येथील शिवरकर रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये घडली.

याप्रकरणी नितीन आरोळे (वय 58, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन आरोळे याचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी फ्लॅटचा सेफ्टी दरवाजा उघडून हॉलचे
लॅच लॉक तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटातील 4 लाख 33 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.