Pune : गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक

एमपीसी न्यूज – शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर ( Pune ) अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मुख्य आरोपी गणेश मारणेला नाशिक रोड येथून अटक केली.

Pune : राष्ट्रवादीचा कसबा विधानसभा मतदारसंघात पदनियुक्ती सोहळा

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह  16 जणांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी  मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. शरद मोहोळचा 5  जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना  पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला ( Pune ) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.