Pune : भाजपा पुणे शहर युवा मोर्चाची आढावा बैठक संपन्न

एमपीसी न्यूज – महाविजय 2024 *” अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी पुणे शहर ( Pune)  युवा मोर्चाची आढावा बैठक भाजपा पुणे शहर कार्यालय येथे संपन्न झाली. बैठकीत बूथ चलो अभियान, नमो चषक, शक्ती केंद्र, बूथ सशक्तिकरण हे कार्यक्रम नागरिकांसाठी प्रभावीपणे कसे राबवले जाऊ शकतात, युवा मोर्चा म्हणून युवा वर्गात नवमतदाता अभियानासारखे उपक्रम सक्षमपणे कसे राबवू शकतो याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.  

 Pune : गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक

 याप्रसंगी भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस  राघवेंद्र बाप्पू मानकर, सरचिटणीस पुनीत जोशी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष करण मिसाळ तसेच युवा मोर्चाचे सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. धीरज घाटे शहराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्ष बांधणीवर प्रामुख्याने भर दिला आहे. नवनवीन कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना विविध पदे दिली आहेत. त्याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे सांगण्यात येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.