Pune : राष्ट्रवादीचा कसबा विधानसभा मतदारसंघात पदनियुक्ती सोहळा

एमपीसी न्यूज – ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे ब्रीद घेऊन (Pune)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सशक्त बनवण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते आपले योगदान देत आहे.

आज सदाशिव पेठेतील उद्यान कार्यालय येथे कसबा विधानसभा मतदारसंघात पदानुयुक्ती तसेच स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पदनियुक्ती समारंभास उपस्थित राहून राष्ट्रवादीचे (Pune)शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

Pune: यशोफेस्ट -आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

राज्यभर ‘अजित पर्व संकल्प विजयाचा 2024’ अभियान राबवले जात असून त्यासंदर्भात उपस्थितांना मानकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे, माजी नगरसेवक दत्ता सागरे, वनराज आंदेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे, शुभम माताळे, महिला अध्यक्षा प्रियाताई गदादे, युवती अध्यक्षा पूजा झोळे, क्रीडा सेल अध्यक्ष राजेंद्र देशमुख, अशोक जाधव, सुनिल खाटपे, अजय दराडे, महेश शिंदे, गोरख भिकुले, राहुल पायगुडे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.