PCMC : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिका काढणार 550 कोटींचे कर्ज

एमपीसी न्यूज –  आशिया खंडातील श्रीमंत महापालिका ( PCMC) असा लौकिक असलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन  मोशी रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी कर्ज काढणार आहे. 550 कोटींच्या कर्जासाठी  महापालिकेने बँकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे शहरवासीयांच्या डोक्यावर आता कर्जाचा भार पडणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची  सदस्यांची मुदत  12 मार्च 2022 ला पूर्ण झाल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे.  महापालिकेचा अर्थसंकल्प केंद्राच्या योजनांसह सुमारे साडेसात हजार कोटींचा आहे. त्या माध्यमातून दरवर्षी विकास प्रकल्प राबविले जातात. आजपर्यंत विविध योजनांसाठी कर्जरोखे घेतले जात होते. मात्र, आता थेट कर्ज काढण्याची तयारी सुरू आहे.

Pune : राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत मणिपूर महिला संघाचे वर्चस्व

महापालिकेच्या वतीने शहरात हरित रुग्णालयांची उभारणी करणे आणि महामार्गाचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि टेल्को रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध बँकांकडून कमी व्याजदराने मुदत कर्ज घेण्यात येणार आहे. सुमारे 12 ते 15  वर्षे कालावधीसाठी कमी व्याजदराने कर्ज मिळविण्यासाठी बँकांना आवाहन केले आहे. कमी दर मिळाल्यास बँक आणि कर्ज घेण्याची निश्चिती करण्यात येणार आहे.

प्रशासकीय राजवटीत कर्ज घेण्यावर भर

महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी असताना कोणत्याही विषयावर सुरुवातीला स्थायी समिती, त्यानंतर विविध विषय समित्या तसेच सर्वसाधारण सभेत चर्चा होते. त्यानंतर तो विषय मंजूर करून त्यावर अंमलबजावणी केली जाते. मात्र, प्रशासकीय राजवट सुरू असल्याने सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे निर्णय प्रशासनच घेते. आयुक्तांनी विषय मांडल्यानंतर प्रशासक म्हणून तेच विषय मंजूर करतात. प्रशासकीय राजवटीत कर्जाचा विषय रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.