Pune : राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत मणिपूर महिला संघाचे वर्चस्व

एमपीसी न्यूज –  मणिपूरच्या महिला संघाने तीन गटांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवताना ( Pune) येथे सुरू झालेल्या 41 व्या वरिष्ठ व 25 व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत वर्चस्व गाजवले.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग संकुलात सूरू असलेल्या या स्पर्धेत सर्व्हिसेस आणि सेना दलाच्या पुरूष संघांनी विविध गटांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.

मणिपूरच्या पूनम व रुक्मिणी यांनी 8.29.03सेकंदात अंतिम फेरी गाठताना लाईट वेट डबल स्कल्स स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. तर, कॉक्सलेस पेअर्स गटात गुरबानी व दिलज्योत या कौर बहिणींनी 09.16.04सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी बजावली. डबल स्कल्स पेअर्स स्पर्धेत थांगजाम प्रिया देवी व हाओबजाम देवी यांनी 08.46.06सेकंदात अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने सिंगल स्कल्स विभागात 09.40.06 सेकंदात उपांत्य फेरी गाठताना पदकाच्या आशा कायम राखल्या.

Pune: यशोफेस्ट -आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

पुरुष विभागात यजमान सर्व्हिसेस संघाने पाच गटात आर्मी संघाने तीन गटात अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत हांगझाऊ आशियाई स्पर्धेतील कांस्य पदक विजेता सर्व्हिसेसचा जसविंदर भीमा, पूनित आशिष या संघाने सहजपणे अंतिम फेरी गाठली. तसेच सेना दलाच्या संघाने कोक्सलेस एटस, डबल स्कल्स, लाईट वेट डबल स्कल्स, क्वाड्रापल स्कल्स, सिंगल स्कल्स या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, गतविजेत्या सलमान खान याने 08.32.01सेकंद वेळ नोंदवत उपांत्य फेरीत गाठताना सुवर्ण पदकाच्या आशा कायम ठेवल्याने

सेना दलाच्या बाबू लाल यादव आणि लेखराम यांना कॉक्सलेस पेअर्स गटात 07.56.02सेकंदात अंतिम फेरी गाठतना कोणाचाही प्रतिकार झाला नाही. कॉक्सलेस एटस, डबल स्कल्स या गटात ही आर्मी च्या पुरूष संघाने अंतिम फेरी गाठली

बलराज पणवर आणि दत्तू भोकनळ यांच्यात या दोन ऑलिंपिक पटू मध्ये झालेली शर्यत आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरली. बलराजने दत्तू भोकनळचे आव्हान मोडून काढताना सिंगल स्कल्स विभागात अंतिम फेरीत धडक ( Pune) मारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.