Pune: यशोफेस्ट -आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

एमपीसी न्यूज – यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(Pune) (आयआयएमएस) च्यावतीने  दिनांक 29 व30 जानेवारी  2024रोजी आयोजित  दोन दिवसीय  ‘यशोफेस्ट’ या आंतरमहाविद्यालयीन  महोत्सवात  विद्यार्थ्यांनी  उत्साही सहभाग  नोंदवला.

आयआयएमएसचे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे, डॉ. भरत  कासार,डॉ. सचिन बोरगावे व डॉ.सचिन वरपडे यांच्या  प्रमुख  उपस्थितीत  ‘यशोफेस्ट’ चे   उद्घाटन  करण्यात  आले.

Pune : वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसविणारे अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त

या दोन दिवसीय महोत्सवात शेप  द कोड, ब्लाईंड  कोडिंग,मार्केटनामा, फेस पेंटिंग,बिझनेस  प्लान, चमत्कारिक  जाहिराती, पोस्टर,फोटाग्राफी  अशा  दहा  प्रकारच्या  स्पर्धा आयोजित  करण्यात  आल्या  होत्या.

या महोत्सवात आयएमसीसी, मॉडर्न  इन्स्टिट्यूट, आयआयसीएमआर, (Pune)डी. वाय. पाटील  पिंपरी,प्रतिभा  कॉलेज,आयबीएमआर, झील कॉलेज  ऑफ इंजिनिअरिंग,महात्मा फुले  महाविद्यालय,नवसह्याद्री  गृप ऑफ इन्स्टिट्यूट, एस. बी.पाटील  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट या संस्थांमधील सुमारे  ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

या महोत्सवाच्या आयोजनासाठी  आयआयएमएसच्या  विद्यार्थ्यांनी मोलाचे  योगदान दिले. तर  डॉ. मधुरा देशपांडे व  युगंधरा  पाटील  यांनी महोत्सवाचे  समन्वयक  म्हणून काम पाहिले. तसेच  संस्थेचे  संचालक  डॉ. शिवाजी मुंढे,डॉ. वंदना  मोहंती व डॉ. अश्विनी  ब्रम्हे  यांनी  मोलाचे  मार्गदर्शन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.