Pune : वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसविणारे अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसविणारे अमितेश कुमार (Pune)पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त झाले आहे. सप्टेंबर 2020रोजी अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती.

नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद (Pune)शहराचे पोलिस आयुक्त म्हणून आणि मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे.

Pune: ‘1995’  दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिमाखात संपन्न

नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.

2007मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.