Pune : पुण्यातील भाजपच्या आमदारांना उमेदवारी जाण्याची भीती

एमपीसी न्यूज – आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Pune)भाजपाच्या आमदारांना आपली उमेदवारी राहणार की जाणार, याची भीती सतावत आहे. कारण, भाजपच्या राज्यातील हेडमास्तरने पुण्यातील आमदारांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड मागविले आहेत.

त्यामुळे नापासाचा शिक्का बसल्यास उमेदवारी जाण्याच्या धास्तीने कामकाजाची गोळाबेरीज करण्यासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. त्याचा आमदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.

PMC : पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाचे मोठे षडयंत्र; माजी नगरसेवकांचा आरोप

येत्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune) अजित पवार गटाला वाटेकरी करून घ्यावे लागणार आहे. अजित पवार गटाकडून वडगाव शेरी, हडपसर या मतदार संघांबरोबरच खडकवासला या विधानसभा मतदारसंघावरही दावा केला जाणार असल्याची कुजबुज आहे.

मागील पाच वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा या रिपोर्ट कार्डमध्ये असणार आहे. सध्या हडपसर विधानसभा आणि वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी भाजपच्या योगेश टिळेकर यांचा केवळ 2800 मातांनी पराभव केला होता. तर, वडगांवशेरी मतदारसंघात भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी केलेला पराभव जिव्हारी लागला आहे.

खडकवासला मतदारसंघात अजित पवार यांना मानणार मोठा वर्ग आहे. या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा केवळ 2500 मातांनी भाजपचे भीमराव तापकीर यांनी पराभव केला होता.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर निवडून आले. सध्या शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे, कोथरूडमध्ये उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.