PMC : पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाचे मोठे षडयंत्र; माजी नगरसेवकांचा आरोप

एमपीसी न्यूज – नांदेड सिटीतील सदनिका धारकांना (PMC)
PT 3 फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नाही.
नांदेड सिटी मधील सदनिका धारकांचा कायदेशीर हक्क हिरावून घेतलेला आहे, आणि आता त्यांना त्यांचा अधिकार परत मिळेल असे दिसताना हा फॉर्म भरून आम्ही तुम्हाला टॅक्स कमी करू अशी लालच दाखवलेली आहे, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे.

Chinchwad : पेंटीग काम करताना केला घरातील 4 लाखांच्या ऐवजावरून हात साफ

तसेच , PT 3 फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेने केलेली “कर आकारणी” मान्य आहे असे त्यांना लेखी देऊन, “कायम स्वरूपी” कर तुम्हावर लादण्यात येईल असा आरोपही करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या कर आकारणी कर संकलन विभागाच्या या (PMC) षडयंत्राला बळी पडू नका हा PT3 फॉर्म भरून देऊ नका, हा फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला भविष्य काळामध्ये सवलत मिळणार नाही, असा प्रचार चुकीचा आहे, असेही या नगरसेवकांनी म्हटले आहे.

लोकसभेचे व विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आमदार भीमराव तापकीर, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कानावर आम्ही हा विषय घालणार आहोत. तोपर्यंत कुणीही PT 3 फॉर्म भरून देऊ नका, अशी विनंती या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.