Chinchwad : पेंटीग काम करताना केला घरातील 4 लाखांच्या ऐवजावरून हात साफ

एमपीसी न्यूज – घरातील पेटींगचे काम करत (Chinchwad)असताना घरातून तब्बल 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. हा सारा प्रकार 29 मार्च 2023 रोजी चिंचवड येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन या चार तासाच्या कालावधीत घडला.

याप्रकरणी रोहीत तानाजी काटकर (वय 34 रा.चिंचवड) यांनी (Chinchwad)चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. यावरून सुरज सिंग (रा.उत्तररप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chakan : जेवणाचे बील न देता हॉटेल मालकाकडे हप्त्याची मागणी करणाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी घराचे रंगकाम काढले होते. य़ावेळी आरोपींनी घराचे पेटींगचे काम करत असताना घरातील कापाटातून 79 ग्रॅम वजनाचे 3 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 15 हजार रुपये रोख असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी यांना ही बाब उघड होताच त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.