Chakan : जेवणाचे बील न देता हॉटेल मालकाकडे हप्त्याची मागणी करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलधील दारू व जेवणाचे बील न देता हॉटेल मालकालाच (Chakan)धमकावून हप्त्याची मागणी कऱणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना सोमवारी (दि.18) रात्री चाकण येथील ड्रीमलँड हॉटेलमध्ये घडली.

प्रशांत बाबुराव दातार (वय 22 रा.चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद कृष्णाप्पा शेट्टी (वय 42 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये (Chakan)आरोपीयाने जेवण व दारु पार्सल घेतले, ज्यावेळी फिर्यादी यांनी त्याला पार्सलचे बिल मागितले त्यावेळी आरोपीने नकार देत मी आत्ताच जेलमधून आलोय, मला रोज जेवण व दारुद्याची अशी मागणी केली.

फिर्यादीने त्याला नकार दिला असता आरोपीने फिर्यादीला शवीगा करत हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल अशी धमकी देऊन आरडाओरड करत परिसरात दहशत पसरवली. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.