Pune : आकसापोटी खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या – प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज – एकिकडे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून (Pune) “महासंसदरत्न” पुरस्कार जाहीर होतो. तर, दुसरीकडे जनतेचे प्रश्न मांडून आमची कोंडी करता, अशा आकसापोटी खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष (शरद पवार गट) प्रशांत जगताप यांनी केला.

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. माजी नगरसेवक सचिन दोडके, काका चव्हाण, स्वप्नील दुधाने, किशोर कांबळे यावेळी उपस्थित होते.

Chakan : जेवणाचे बील न देता हॉटेल मालकाकडे हप्त्याची मागणी करणाऱ्याला अटक

या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आज सकाळी 9 वाजता वारजे उड्डानपुलाखाली हे आंदोलन घेण्यात (Pune) आले. यावेळी मोदी सारकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी पाठ फिरविल्याची कुजबुज होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.