Pune : नीलम गोऱ्हे व मिलिंद नार्वेकर यांचे दंगल घडविण्याबाबत संभाषण; अजित पवार यांच्या प्रकरणामुळे पुण्यातील निमंत्रण रद्द – मीरा बोरवणकर

एमपीसी न्यूज – माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना 26 नोव्हेंबर रोजीचे (Pune)दक्खनी अदाफ फौंडेशन च्या पुणे लिटरेचर फेस्टिवलसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण बोरवणकर लिखित मॅडम कमिशनर या पुस्तकातील पालकमंत्री अजित पवार यांच्या येरवडा जमीन हस्तांतरण प्रकरणामुळे रद्द करण्यात आला असल्याचा दावा मीरा बोरवणकर यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी मला फोन आला, त्यात त्या लेखिकेने म्हंटले(Pune) की, “मागील तीन चार दिवसांपासून आम्ही विचार करतोय की तुम्हाला कस सांगावं, आपल्याला आता हा कार्यक्रम घेता येणार नाही. अजित दादांशी संबधित जे प्रकरण झालय”. याचा मला एकदम धक्का बसला. यावेळी आपण राजकीय व्यक्तीबाबत बोललो आहोत, त्याला प्रतिसाद म्हणून असे काही घडेल याबाबत माहिती होतं, असेही त्या म्हणाल्या.

Nigadi :  संदीप उबाळें यांच्या स्वर गायनाने  रसिक मंत्रमुग्ध

नीलम गोऱ्हे व मिलिंद नार्वेकर दंगल घडविण्याबाबत संभाषणाचा आरोप

मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर पुस्तकात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात दंगल घडवण्याबाबतचं संभाषण झाल्याचा आरोप केलाय. याबाबतही त्यांनी आज गौप्यस्फोट केला. या प्रकरणात पोलिसांकडे कणखर पुरावा होता. पण सरकारने नंतर ती केस काढून घेतली, असा मोठा दावा मीरा बोरवणकर यांनी केला.

“दंगली घडवण्याचा आदेश दिला गेला होता का, ते मला सांगता येणार नाही. त्यादिवशी पुणे बंद होतं. मला स्पेशल ब्रांचने बोलवून सांगितलं होतं की, हे टेलिफोनवरील संभाषण ऐकून घ्या. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा सुरु होती की, इकडे दगडफेक, बस पेटवणं आणखी हिंसाचाराच्या घटना कुठे करायच्या यावर चर्चा सुरु होती”, असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.

“मी तिथे पोहोचण्याआधीच स्पेशल ब्रांचने सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा आदेश दिला होता. त्यांनी बंदोबस्त वाढवला होता. मला वाटलं की, लोकांना माहिती असतं, पुढारी दंगल घडवून आणतात. पण ही एकदम मस्त केस होती. टेक्निकल पुरावादेखील होता. म्हणून आम्ही एफआयआर दाखल केला. पण नंतर सरकारने गपचूप ती केस काढून घेतली”, असा दावा मीरा बोरवणकर यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.