Pimpri Chinchwad : रशियाच्या मुलींना पिंपरी चिंचवडच्या मुली देताहेत भरतनाट्यमचे धडे

एमपीसी न्यूज – रशियातील पर्म शहराच्या स्थानिक स्वायत्त संस्थेने (Pimpri Chinchwad) एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तेथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय मुलींना आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी रशियाच्या मुलींना पिंपरी-चिंचवडच्या कन्यांनी भरतनाट्यमचे धडे दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील वैष्णवी महेश सस्ते ही विद्यार्थीनी तिथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. वैष्णवी आणि तिच्यासोबत शिकणारी श्रीजेनी, कतिका महापात्रा व रशियन शिक्षिका स्वेतलाना या तिघींनी भरतनाट्यम सादर केले.

Pimpri : पिंपरीतील एच.ए.स्कूल 1987 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा अनुभवल्या शाळेतल्या आठवणी

रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी पिंपरी-चिंचवड सांगवीची (Pimpri Chinchwad) विद्यार्थिनी वैष्णवी ने सांगितले की, रशियन नागरिकांना भारतीय संस्कृती, दागिन्यांचे कमालीचे आकर्षण आहे. येथील शिक्षिका देखील आमच्या कडून भरतनाट्यम शिकतात. या कार्यक्रमात तेथील लहान मुलींनी आमच्याकडून काही स्टेप्स शिकल्या व तातडीने सादरही केल्या.

भरतनाट्यमसाठी आम्ही परिधान केलेले आभूषण देखील त्यांना आवडले आणि त्यांनी आमच्याकडून मागून घेतले. येथे शिक्षण घेत असताना त्यांना माहीत होत की आम्हाला भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन येते ते आमच्याकडे शिकण्यासाठी आग्रह धरतात.

 

 

https://www.youtube.com/watch?v=IEI703OAcM8&ab_channel=MPCNews

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.