Alandi : इंद्रायणी घाटावरती ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचे बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज -आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरती (हवेली विभाग) भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण (Alandi)उपोषण ह. भ. प. भगवान महाराज कोकरे दि. 1 नोव्हेंबर पासून करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस सुरू आहे.

त्यांच्या प्रमुख मागण्यां मध्ये
1)संपूर्ण भारत देशामध्ये समान नागरी कायदा व समान शिक्षण कायदा लागू करणे.
2)जाती आधारित असलेले आरक्षण रदद करून आर्थिक निकषांवर व गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.
3)महाराष्ट्रात शेतकऱ्यांने पिकविलेल्या शेत मालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा. असा समावेश आहे.

Pimpri : पिंपरीतील एच.ए.स्कूल 1987 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा अनुभवल्या शाळेतल्या आठवणी
तर इतर मागण्यांमध्ये
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या नद्यांमधील पाणी माणसाने पिण्या इतके शुद्ध असावे.
महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख तीर्थक्षेत्रांत मांस आणि मद्यविक्री कायम स्वरूपी बंद करावी,आळंदी पंढरपूर अश्या असणाऱ्या पालखी मार्गाचे रूपांतर हे पालखी प्रकल्पात करण्यात यावे व प्रत्येक तळ्यांच्या ठिकाणी 25 एकर जागा आरक्षित करून त्या ठिकाणी वारकरी भवन बांधून ,महिना वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी.श्री तुंगारेश्वर वसई या ठिकाणी शासनाने पाडलेला बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम शासनाने त्वरित बांधून देण्यात द्यावा.

आळंदीतील सिध्दबेट याचा विकास आराखडा तयार करून जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्यात यावे,वारकरी शिक्षण संस्थांना व अध्यापकांना शासकीय अनुदान देण्यात यावे. श्री संत ज्ञानेश्वर जीवन मुक्तीदान संस्थान व गोशाळा यांचा अनेक वर्षे रखडलेला जागेचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात यावा.

महाराष्ट्रातील संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमल बजावणी करून गोशाळांना प्रति गोवंश प्रति दिन किमान 50 रु अनुदान देण्यात यावे.महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती मधून मोगलांचा इतिहास काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा, भारताचे संविधान ,राष्ट्रपुरुषांचे व साधू संतांचे चरित्र, नितीमूल्य, योग प्राणायाम, याचा समावेश करावा,यांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.