Pune : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा साताऱ्यात प्रवेश; पुणे ग्रामीण पोलिसांनी मानले आभार

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यात (Pune) दाखला झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून पालखी सोहळा निर्विघ्न पार पडल्याबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस दलाचे आभार मानले.

आळंदी येथून 11 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. आळंदी, पुणे मार्गे पालखी 14 जून रोजी सासवड मुक्कामी थांबली. तिथून पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी सोहळा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी बंदोबस्त ठेवला. सासवड, जेजुरी, वाल्हे येथे मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे रविवारी शाही नीरा स्नान झाले. त्यानंतर पालखी रविवारी मुक्कामासाठी लोणंद येथे पोहोचली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.

नीरा नदीच्या तीरावर पाडेगाव येथे पालखी स्वागताच्या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस बँड पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. पालखीच्या इतिहासात पोलिसांकडून मानवंदना देण्याची घटना प्रथमच घडली (Pune) आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, “माऊली आपली सेवा करताना आम्हाला मोठा आनंद झाला. आपल्या कृपाशिर्वादाने पालखी सोहळा निर्विघ्नपणे पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यात दिवसरात्र जबाबदारीने सेवा बजाविणार्‍या सर्व अमलदारांसह अधिकार्‍यांचे मनःपूर्वक आभार.”

Pune News : जागतिक स्नूकर चॅम्पिअनशिपसाठी 17 वर्षाखालील पुण्याच्या आरव संचेतीची निवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.