Talegaon : गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षकाला मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – गस्तीवर असताना एका चायनीजच्या गाडीवर काहीजणांचे भांडण सुरु असल्याची माहिती मिळाल्याने गस्तीवरील पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे भांडण सोडवत असताना तिघांनी मिळून पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण केली.

Pune : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा साताऱ्यात प्रवेश; पुणे ग्रामीण पोलिसांनी मानले आभार

पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेगाव स्टेशन येथे स्मिता चायनीज जवळ घडली.

दिनेश कसरत प्रधान (वय 24), सरोज जगन्नाथ माझी (वय 23), राजू बिसंभार प्रधान (वय 22, तिघे रा. वतननगर, तळेगाव दाभाडे. मूळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक मदेवाड, पोलीस अंमलदार दीपक मोरे आणि विशाल वाळूंज हे तळेगाव स्टेशन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी चौकातील स्मिता चायनीज या दुकानाजवळ काही लोक भांडण करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

 

त्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी आरोपींनी उपनिरीक्षक मदेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. फिर्यादी यांच्या शर्टचे आणि शोल्डरचे बटन तुटले.

परिस्थिती नियंत्रण येईना म्हणून पोलीस अंमलदार मोरे आणि वाळूंज यांनी पोलीस ठाण्यातून अधिकची कुमक मागवली. अधिकची कुमक येताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.