Pune : पुण्यातील विविध साहित्याच्या 20 गोडाऊनला भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोंढवा रोडवरील  (Pune) विविध साहित्याच्या तब्बल 20 गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम सुरू आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,कोंढवा रोडवरील गंगाधाम चौका जवळ असलेल्या आईमाता मंदिराजवळ बिस्कीट,सिमेंट, मोल्डिंग यासह इतर साहित्याचे तब्बल 20 गोडाऊनला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

 

या सर्व गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.तर या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 22 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले आहे.तर या आगीचे नेमके कारण समजू  (Pune) शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.