Hinjwadi : उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे सकाळच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) पहाटे पाच ते सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत पंचरत्न चौक, सुसगाव येथे घडली.

Pune : पोलीस असल्याचे सांगत ज्येष्ठाला लुटले

लक्ष्मण शिवाजी बालगुडे (वय 29, रा. पंचरत्न चौक, सुसगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी (Hinjwadi) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा शनिवारी पहाटे पाच ते सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत उघडा होता. उघड्या दरवाजा वाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि 22 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. हिंजवडी (Hinjwadi) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.