Chinchwad : शहरात विकेंडसह इयर एंडिंगचीही तयारी जोरात; पोलिसांकडून खबरदारी

एमपीसी न्यूज – या विकेंडला इयर एंडिंग देखील Chinchwad)आहे. त्यामुळे नाचगाणे, मजा मस्ती, धमाल करण्यासाठी अनेकांचे प्लॅन सुरु झाले आहेत. डीजेच्या दणदणाटात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरु आहे.

यासाठी हॉटेल, रेसॉर्ट, पार्टी हॉल, लॉन, रुफटॉप आदिंचे बुकिंग जोरात सुरु आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील काही खबरदारी घेतली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरालगत हिंजवडी, तळवडे येथे मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांना शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस सुट्टी असते. त्यात यावर्षीचा इयर एंड रविवारी होत आहे. त्यामुळे आयटीयंस जरा जास्तच खुश आहेत. सर्वच स्तरातील लोकांना नवीन वर्षाचे वेध लागलेले असतात. पण त्यात आयटीयंसचा उत्साह थोड्याफार प्रमाणात अधिकच असतो.

Railway : नागपूर-कोल्हापूर रेल्वेच्या सहा फेऱ्या रद्द तर गोंदिया-कोल्हापूर रेल्वे पुण्यापासून धावणार

याच आयटीयंसच्या आवडी निवडी समोर (Chinchwad)ठेऊन अनेक हॉटेल मालकांनी 31 डिसेंबरच्या पार्ट्यांचे जंगी नियोजन केले आहे. आगाऊ बुकिंगद्वारे विविध पॅकेजेस दिले जात आहेत. रविवार आणि 31 डिसेंबर हा दुहेरी योग जुळून आल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर शहरासह आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल्स देखील आगाऊ बुकिंग घेऊ लागली आहेत. शनिवार आणि रविवार मावळ, मुळशी मधील परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. दिवसभर पर्यटन स्थळी भटकंती करून रात्रीच्या वेळी मस्त एन्जॉय करण्याचा मूड प्रत्येकजण बनवत आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील तयार झाले आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या आनंदावर कुठेही विरजण पडू नये यासाठी पोलिसांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात आहे. हॉटेल चालकांना वेगवेगळे परवाने देताना अनेक बाबींची पडताळणी केली जात आहे. प्रत्येक ग्राहकाला सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची लेखी हमी हॉटेल चालकांकडून घेतली जात आहे. मद्य प्राशन करून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले आहे. त्या दृष्टीने पोलीस 31 डिसेंबर रोजी रात्रभर नाकेबंदी लावणार असून गस्त देखील वाढवणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.