Pune : कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार, पुण्याच्या बाणेर परिसरातील घटना

एमपीसी न्यूज : पुण्यात चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Pune ) हद्दीत एका कोरियन व्यक्तीच्या घरावर आज सकाळी गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली. घरातील बाल्कनीच्या काचेवर गोळी लागली आहे. यात कोणी जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान गोळीबार हा चुकून झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 49 वर्षीय कोरियन व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरियन व्यक्ती हे नागरस रोडवरील अरेना सोसायटीत राहतात. दरम्यान ते चाकण येथील एका नामांकित कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.

दरम्यान आज (मंगळवार) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळी झाडण्यात आली. गोळी काचेवर (Pune) लागल्याने मोठा आवाज झाला.

PCMC : प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; आयुक्तांचे निर्देश

त्यामुळे ते बाहेर आले. पाहणी केली असता त्यांना गोळी झाडण्यात आल्याचे दिसून आले. लागलीच ही माहिती चतु:श्रुगी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.