Pune : आधी तरुणीसोबत शरीर संबंध; नंतर केले न्यूड फोटो व्हायरल

एमपीसी न्यूज : एका तरुणीसोबत (Pune) ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन करून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याच तरुणीचे न्यूड फोटो काढून ते फिर्यादी तरुणीच्या काकाच्या व्हाट्सअपवर पाठवून फिर्यादीची बदनामी केली. याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार 21 वर्षीय तरुणाविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी तरुणी ही पुण्यातील आहे, तर आरोपी हा अकलूजचा रहिवासी आहे. दोघांचीही ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत स्वारगेट परिसरातील एका लॉजवर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीचे न्यूड फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर फिर्यादी तरुणीच्या काकाच्या व्हाट्सअपवर हे न्यूड फोटो पाठवून फिर्यादीची बदनामी केली. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक (Pune) तपास सुरू आहे.

BJP : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.