BJP : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या (BJP) आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विराेधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाइलवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता.

त्यात माजी आमदार जाधव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचे आढळून आले. जाधव यांनी (BJP) समाजमाध्यमावर गृहमंत्री शहा आणि पालकमंत्री पाटील यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Pune Crime : ”लक्षात ठेव मी तुला सोडणार नाही”, महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.