Pune : मेडिकल व्यवसायाच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका मेडिकलची फ्रेंचायजी आणि दुसऱ्या (Pune) कंपनीत भागीदारीच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून 40 लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 27 सप्टेंबर 2021 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत कोरेगाव पार्क येथे घडला.

वसंत पांडुरंग साबळे (वय 64, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम शिवाजी मोरे (वय 39, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DEHUROAD CRIME : दिडशे उठाबशा अन गळा दाबून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या आरोग्य भारती मेडिकल स्टोअर्सची फ्रेंचायजीसाठी फिर्यादीकडून 10 लाख रुपये घेतले. तसेच आरोग्यवत मेडिकेअर प्रा ली कंपनीत 20 टक्के भागीदारीसाठी 30 लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यवसायाच्या खोट्या जाहिराती बनवून आरोपीने फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास (Pune) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.