Pune Ganapati Visarjan : पुण्यातील मानाच्या गणपतींचे पारंपारिक प्रथेने विसर्जन

एमपीसी न्यूज : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले आहे. या दरम्यान पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आता इतर गणपतीनी विसर्जनाच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं 4.15 मिनीटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन हे 7.22 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन रात्री 8.02 वाजता झाले.

Pune Ganapati Visarjan : मानाच्या पहिल्या कसबा आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन

मानाच्या गणपती विसर्जनाशिवाय इतर गणपतींचे विसर्जन होऊ शकत नाही. ही पुण्याची प्रथा आहे. ती कायम ठेवत तसेच यंदा निर्बंधमुक्त मिरवणूक असल्याने पुण्यात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. ढोल ताशे, डॉल्बीच्या तालावर पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला निघाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.