Pune Ganapati Visarjan : मानाच्या पहिल्या कसबा आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन

एमपीसी न्यूज : पुण्यातील पहिल्या मानाच्या (Pune Ganapati Visarjan) गणपतीचे दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी मानाच्या दुसऱ्या म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपतीचे 5 वाजून 40 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. पुण्यामध्ये विसर्जनास सुरुवात झाली असून पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे पारंपारिक पद्धतीने हौदात विसर्जन करण्यात आले. श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करत तांबड्या जोगेश्वरीचे पतंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. 

Pune Ganpati Visarjan 2022 : चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे बनले कसबा पेठ गणपतीच्या पालखीचे भोई

आज अनंत चतुर्थी निमित्त संपूर्ण पुणे गणरायाच्या (Pune Ganapati Visarjan) भक्ती रसात नाहून निघत आहे. संपूर्ण पुण्यनगरीत ढोल ताशांच्या गजरात विसर्जनाची मोठी धामधूम आहे. मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्याशिवाय इतर गणपतींचे विसर्जन होत नाही अशी पुण्यात प्रथा आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्या मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्याने इतर गणपतींच्या विसर्जनाची तयारी सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.