Bawdhan car fraud : मॉडीफाय करण्यासाठी आलेल्या गाडीची परस्पर विक्री

एमपीसी न्यूज : मॉडीफाय करण्यासाठी आलेली गाडी मालकाच्या नकळत परस्पर विकून तसेच ज्या व्यक्तीला विकली आहे, त्याचीही फसवणूक केली.(Bawdhan car fraud) ही घटना 11 मार्च 2021 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.

करणसिंग किसन मकवानी (वय 62, रा. न्यू मोदी खाना पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशांत सुरेंद्र सिसोदिया (रा. बावधन) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MNS News : अमित ठाकरे यांनी दिल्या पिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांना भेटी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे बावधन येथे वाहने मॉडीफाय करण्याचे दुकान आहे. त्याच्याकडे एमएच 12/सीएच 9719 हा टेम्पो ट्रॅव्हलर मॉडीफाय करण्यासाठी आला होता. त्याचे मूळ मालक अक्षय बागवानी यांच्या आपरोक्क्ष ती गाडी आरोपीने फिर्यादी यांना विकली.(Bawdhan car fraud) त्याबदल्यात त्याने गाडीची कागदपत्रे न देता फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. हा प्रकार फिर्यादी यांना समजला असता त्यांनी आरोपीकडून पैसे परत मागितले. तेंव्हा आरोपीने फिर्यादी यांना धनादेश दिले. त्यानंतर चेक बाउन्स करून फिर्यादींची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.