MNS News : अमित ठाकरे यांनी दिल्या पिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांना भेटी

एमपीसी न्यूज – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS News) यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली. आणि गणपतीचे दर्शन घेतले.

मोशी, इंद्रायणी नगर, खराळवाडी, राम नगर, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, डांगे चौक गणेश नगर, किवळे या ठिकाणच्या काही मंडळाना भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर,विशाल मानकरी,दत्ता देवतरासे, प्रतिक शिंदे, श्रध्दा देशमुख, अक्षय नाळे, नारायन पठारे, प्रकाश त्रिमले, सुदिर जम, रेखा जम, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, सुशिल पोतदार, सगिता देशमुख, सुजाता काटे, सुशिल नेटके, सतिश कदम, राजु भालेराव, पुणे शहर पदाधिकारी प्रंशात कनोजिया, आशिष साबळे, अमोल शिंदे, सागर कुलकर्णी हे पदाधिकारी (MNS News) उपस्थित होते.

Pune Ganpati Visarjan 2022 : चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे बनले कसबा पेठ गणपतीच्या पालखीचे भोई

अमित ठाकरे यांच्या दौ-यामुळे शहर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ठाकरे यांनी मंडळांना भेटी दिल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.