Ganpati visarjan in Germany : जर्मनीतही ढोल ताशाच्या गजरात गणरायाची विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज : जर्मनीतील एरलांगन शहरात देखील प्रथमच ढोल, ताशाच्या गजरात आणि शेकडो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.(Ganpati visarjan in Germany) मराठी विश्व फ्रांकेन जर्मनी तर्फे आयोजित केलेल्या या मिरवणुकीत अठरा जणांच्या ढोल, ताशा व झांज पथका सोबत 38 महिला व पुरुष गटाने लेझीम नृत्य सादर केलं तर छोट्या मुलांनी थोर भारतीय महापुरुषांची वेशभूषेत देखावे सादर करत उपस्थितांना मिनी इंडिया चे दर्शन घडवलं.

जर्मनीतही मराठी विश्व फ्रांकेन जर्मनी तर्फे मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. तर ढोल ताशाच्या गजरात गणरायाची विसर्जन मिरवणूकही काढण्यात आली.(Ganpati visarjan in Germany) विशेष म्हणजे विसर्जनचा हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील सरकारी कार्यालयच्याच्या समोर आयोजित करण्यात आला होता.या निमित्ताने प्रथमच जर्मनी आणि युरोपचा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो तिथे देखील भगवा फडकला. मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे संस्थापक रश्मी गावंडे,तृप्ती सपकाळ, अमोल कांबळे, प्रशांत गुळस्कर यांनी यासाठी विशेष सहकार्य केले.

Pune Ganpati Visarjan 2022 : चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे बनले कसबा पेठ गणपतीच्या पालखीचे भोई

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जर्मन स्थित सर्व भारतीयांनी मनापासून सहकार्य केले आणि या सहकार्यास जर्मनीच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात जवळपास आठशे लोकांनी सहभाग नोंदवला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.