Idol donation : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मूर्तीदान उपक्रमाला दिली भेट

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पवना नदीवरील चिंचवड येथील घाटाची पाहणी केली. तसेच मूर्तीदान उपक्रमाला भेट दिली.(Idol donation) काही वेळ थांबून उपक्रमाची संपूर्ण माहिती घेतली.

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला आज (शुक्रवारी) उत्साहात निरोप दिला जात आहे. चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे सहपत्नीक आले होते.(Idol donation) अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके उपस्थित होते.

Sate grampanchayat : साते ग्रामपंचायत मध्ये महिलाराज ! सरपंचपदी आरती आगळमे यांची बिनविरोध निवड

आयुक्त सिंह काही वेळ व्यासपीठावर बसले. काही गणेश मंडळाचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्त सिंह चिंचवड येथील घाटावर गेले. घाटाची पाहणी केली. नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे थेट नदीत गणेशाचे विसर्जन करू दिले जात नाही.( Idol donation) नदीकाठी बॅरिकेट्स लावले आहेत. गणपती विसर्जनासाठी नदी किनारी कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. या हौदात गणेशाचे विसर्जन केले जात आहे. अनेकांकडून मूर्तीदानही केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.