Sate grampanchayat : साते ग्रामपंचायत मध्ये महिलाराज ! सरपंचपदी आरती आगळमे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज : साते ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आरती सागर आगळमे यांची नुकतीच बिनविरोध निवड   करण्यात आली. (Sate grampanchayat) मावळते सरपंच संतोष शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा  दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी दि.रोजी साते ग्रामपंचायत येथे निवडणूक धेण्यात आली होती.

दरम्यान सरपंच व उपसरपंचपदी महिला असल्याने पहिल्यांदाच ग्रामपंचायतमध्ये महिलाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रीया मंडल अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती, व सहाय्यक म्हणून ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी काम पहिले.

Jnana prabodhini ganpati visarjan : ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात, भावपूर्ण वातावरणात दिला बाप्पाला निरोप

यावेळी सरपंच पदासाठी केवळ एकाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश जगताप यांनी जाहीर केले.(Sate grampanchayat) साते ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दी मधील सर्व वाडी वस्तींमध्ये मूलभूत सुविधां सोबत सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहचविणार असल्याचे नवनियुक्त सरपंच आरती आगळमे यांनी सर्वाना आश्वासित केले. याप्रसंगी साते ग्रामपंचायतचे उपसरपंच आम्रपाली मोरे,सदस्य सखाराम काळोखे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.