Pune : गिरीश बापट म्हणतात, ‘काकडे यांना आकडे विचार’

एमपीसी न्यूज- मी पक्षाचा कार्यकर्ता असून लोकसभा निवडणुकीत पक्ष ज्याला संधी देईल त्याचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यानी मांडली. सर्वाधिक मतांनी निवडून येणार असल्याचे विधान संजय काकडे यांनी केले आहे. त्यावर ते म्हणाले की, काकडेना आकडे विचार, असे म्हणत खासदार संजय काकडे यांना टोला लगावला.

पुण्यातील वाडेशवर कट्ट्यावर पुण्याचा भावी खासदार कोण अशी चर्चा मागील दोन दिवसांपूर्वी रंगली होती. त्यावेळी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपकडून मलाच लोकसभेची संधी मिळणार आणि तीन लाखाहून निवडून येणार असल्याचा दावा केला. संजय काकडे यांच्या त्या विधानानंतर पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘एक वादळ चित्रबद्ध करताना ….! स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ….!’ यांच्या भव्य व्यक्तीचित्राच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांना आगामी पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत आणि संजय काकडे यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले. बापट म्हणाले की, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असणार असून त्या उमेदवाराचा काम करणारा मी एक कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक मतांनी निवडून येईन असे विधान संजय काकडे यांनी केले आहे. त्यावर ते म्हणाले की, काकडे यांना आकडे विचार असा टोला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.