Pimpri: महासभेत निकम, सवणे, गावडे, मुंढे, रामुगडे या अधिकाऱ्यांना बढत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे यांना सहशहर अभियंतापदी तर शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना शिक्षणाधिकारी पदावर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना मुख्य अग्निशमन अधिकारी आणि स्थापत्य उपअभियंता दत्तात्रय रामुगडे यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली. याला महासभेने गुरुवारी (दि.20) मंजुरी दिली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहशहर अभियंत्याची तीन पदे मंजूर आहेत. स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील आणि विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे अशी दोन पदे भरलेली आहेत. तर, एक पद रिक्त होते. रिक्त पद भरण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सहशहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी सहशहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे.

शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना शिक्षणाधिकारी पदावर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना मुख्य अग्निशमन अधिकारी आणि स्थापत्य उपअभियंता दत्तात्रय रामुगडे यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. त्याला महासभेने मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.