Moshi : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – सासू सास-यांना मारहाण होत असल्याने भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला ढकलून देत तिचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गौरव रंगनाथ म्हस्के (रा. मोशी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव फिर्यादी महिलेच्या सासू सास-यांसोबत वारंवार किरकोळ कारणावरून भांडण करत होता. गुरुवारी पुन्हा आरोपीने भांडण केले. त्यावेळी आरोपीचे नख लागून फिर्यादी यांच्या सासू जखमी झाल्या. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने त्यांना ढकलून दिले. तसेच त्याने फिर्यादी महिलेचा पाठलाग करून हात पकडला आणि अश्लील वर्तन केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.