Pune – ‘विश्वशांती’ विषयावरील राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनास चांगला प्रतिसाद 

एमपीसी न्यूज –  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल (Pune)आर्ट्स तसेच डिपार्टमेंट ऑफ पीस स्टडीजच्या वतीने आयोजित ‘विश्वशांती’ विषयावरील राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे (Pune)संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे  उदघाटन झाले. यावेळी  ज्येष्ठ चित्रकार डॉ.सुधाकर चव्हाण,युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड,कुलगुरू डॉ.रवीकुमार चिटणीस,डीन प्रा.विनय मुंदडा,प्रा.मिलिंद पात्रे,रजिष्ट्रार गणेश पोकळे, डॉ.श्रुती निगुडकर, डॉ.संजय उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा.सागर गोटखिंडीकर,पल्लवी राजवाडे,योगद्रुम केळकर यांनी संयोजनात मदत केली.

Mahalunge : वृद्ध आईला मारहाण करत घराबाहेर हाकलले; मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल

 एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या प्रदर्शित राज्यातील दोनशे चित्रकारांनी सहभाग घेतला. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी हे प्रदर्शन उत्साहात पार पडले. राज्यस्तरीय स्पर्धेनंतर त्यातील निवडक उत्कृष्ट चित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. यावेळी सहभागी  कलाकारांचा गौरव करण्यात आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.