Alandi : मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील लक्ष्मीमाता चौका जवळील पाण्याच्या टाकीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज एक आंदोलक चढला होता. जो पर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली (Alandi)उतरणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता.

मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी (Alandi)राज्यभर आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे या मागणीसाठी आत्महत्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे. पण अद्याप यावर तोडगा निघाला नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने आळंदी येथे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यात त्या व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आपण आहुती देत असल्याची चिठ्ठी लिहिली होती.

त्यानंतर आळंदी येथे आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी येथील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर ही घटना घडली. श्रीकांत काकडे हा तरुण हातात ‘एक मराठा, लाख मराठा मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेला फलक घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. टाकीवर जात असताना तरुणाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी हे पाउल उचलले असल्याचा त्याचा दावा होता.

श्रीकांत याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, हे सरकार मराठ्यांना वेशीला टांगत आहे. मराठ्यांना आत्महत्या करण्यास हे सरकार प्रवृत्त करीत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तरुणांच्या भावना तीव्र होत आहेत. सरकारने याची त्वरित दखल घेतली पाहिजे. आरक्षण दिले नाही तर मराठा समाज या नेत्यांना फिरू देणार नाही. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, असेही त्याने म्हटले होते.

हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला. त्यानंतर आळंदी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, मराठा आंदोलक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांकडून श्रीकांत याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु होते.

Pune – ‘विश्वशांती’ विषयावरील राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनास चांगला प्रतिसाद 

श्रीकांत काकडे यांचे वडील व त्याचे नातेवाईक , सकल मराठा समाजाच्या वतीने डी डी भोसले पाटील व प्रशासन यांना श्रीकांत काकडे यांस समजावून पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवण्यास अखेर यश मिळाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.